सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भिगवण : संतोष माने
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे सत्र काही थांबेना. दररोज कुठे ना कुठे अपघात घडत आहेत. जणू काही पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग "मृत्यूचा सापळा "बनल्याचे दिसून येते. आज सकाळी नऊ वाजता महामार्गावरती सोलापूर दिशेकडून जाणारी क्रूजर मोटर पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना उसाच्या ट्रेलरला धडकली.
यामध्ये सहा जण जखमी झाले आहेत. यामध्ये कासिम पिसा मुल्ला -वय 45 , लक्ष मोहम्मद अली -वय 70, हुसेन दावल (पूर्ण नाव माहिती नहीं ) समस्त ब्रिज नबी उंचाळ वय 24, मोहम्मद हुसेन उंचाळ वय 16, नसीमा नभी उंचाळ वय 45 . सर्व राहणार कोची कोटा , जिल्हा विजापूर, कर्नाटक हे जखमी झाले आहेत.
भरधाव वेगात वाहने जात असल्याने अपघात घडत आहेत. आज सकाळी नऊ वाजता भिगवण जवळील भादलवाडी गावाजवळ एका क्रुझर मोटारीने उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली. क्रुझर मोटारीची अवस्था पाहता अपघात किती भीषण असेल याची प्रचिती येते. मागील चार दिवसांपूर्वी सोमेश्वर रिपोर्टरने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. वेगावर ती नाही नियंत्रण.... तर अपघाताला मिळेल आमंत्रण.. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वाहन चालवताना सावधान या बाळगणे गरजेचे आहे. अन्यथा अपघातांचे सत्र किंवा मालिका अशीच सुरू राहील. रिकामी पोलीस प्रशासनाने सुद्धा वाहनांच्या वेगावर ती नियंत्रण यावे यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. आज पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून क्रुझर कार सोलापूर दिशेकडून पुणे बाजूकडे जात होती.भादलवाडी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने पाठीमागून क्रुझर कार पुढे जाणाऱ्या ऊस भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला धडकली. असा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे.