सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
विकास कामे न संपणारी आहेत. महायुतीच्या माध्यमातून पुढील काळात सर्वांगीण विकास केला जाणार आहे.खरा विकास साधायचा असेल तर लोकांच्या हाताला काम मिळणे गरजेचे आहे. बेरोजगारांच्या रोजगारासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.शेतीला पाणी मिळाले शेती पिकांचे उत्पन्न वाढेल.परिणामी आर्थिक सबलता वाढणार असल्याने शेती पाण्यापासून वंचित असलेल्या वीसगाव खोऱ्यातील ७ गावांसाठी जलउपसासिंचन योजना लवकरच राबवणार असल्याचे भोर, वेल्हा, मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनी प्रतिपादन केले.
भोर,वेल्हा,मुळशीचे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांच्या वरोडी खुर्द ता.भोर नागरी सत्कार समारंभात रविवार दि.१२ आमदार मांडेकर बोलत होते.यावेळी माजी जि.प.उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे,यशवंत डाळ,नितीन थोपटे,मनोज खोपडे,मंगेश दरेकर,भरत बांदल,विलास वरे,प्रवीण जगदाळे,सुरेश कडू,सदाशिव वरे,अरुण वरे,संपत वरे,संपत तनपुरे,सचिन पाटणे,संदीप खाटपे,अविनाश गायकवाड,सोपान सावले,तानाजी चंदनशिव,आदींसह विसगाव खोऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात संतोष घोरपडे म्हणाले अजित दादांच्या माध्यमातून वेशीवर थांबलेला विकास राष्ट्रवादीने केला.विकासाची नांदी राष्ट्रवादिने आणली. आमदार मांडेकर यांच्या रूपाने उर्वरित विकास साधायचा आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वांना सन्मानाची वागणूक दिली जाईल.तर रणजीत शिवतरे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठलीही हुकूमशाही नाही.पन्नास वर्षात झाली नाही ती विकास कामे शंभर टक्के विकास करनार आहोत.विकास कामे होत राहतील जनतेशी संवाद ठेवा.अडीअडचणींना उभा राहणाऱ्याच्या मागे उभे रहा.मतभेद बाजूला ठेवून पक्ष वाढवा.