Baramati News l निंबुतच्या अवैद्य दारूविक्रेत्याची मजोरी : ऊसने पैसे मागितल्याने रक्तबंबाळ होईपर्यंत दांडक्याने मारहाण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : प्रतिनिधी 
निंबुत येथील अवैध दारू विक्रेत्याने उसने पैसे मागितले म्हणून ज्ञानेश्वर नाना भोसले वय 43 रा. निंबुत-शिरसाईवस्ती या युवकास बांबूच्या काठीने व लाथाबुक्याने बेदम मारहाण केली. 
          यामध्ये तो युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला जबर मार लागला आहे.  याबाबत अधिक माहिती सांगताना  ज्ञानेश्वर भोसले म्हणाला मी व  प्रमोद नवले यांच्या मध्ये दारू पिण्यावरून व पैशाच्या देवाण-घेवाणीतून झालेल्या व्यवहारातून प्रथम शिवीगाळ व नंतर हाणामारीचा प्रकार नीरा बारामती रोड नजीक ज्या ठिकाणी अवैध दारू व्यवसाय चालतो त्या ठिकाणी तिघांनी काठी व लाथा बुक्क्यांनी मिळून केलेल्या मारहाणीत पारधी समाजाचा युवक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला असून हाता पायाला गंभीर दुखापत झाली आहे पुढील उपचारासाठी होळ येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. प्रमोद नवले आणि त्याचे साथीदार अनिल पवार व आकाश पवार रा. नींबूत आनंदनगर यांनी ही मारहाण केल्याचा ज्ञानेश्वर भोसले याने सांगितले.
To Top