Baramati News l बारामतीच्या कन्येची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडूनही दखल : उत्कृष्ट 'नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी' पुरस्कार जाहीर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना च्या दिवशी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त चे सन 2024-25 चे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. या पुरस्कारांमध्ये  आठ फाटा-होळ (ता. बारामती) येथील डॉ. राणी बबनराव भगत यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने  'उत्कृष्ट नाविन्यपूर्ण शैक्षणिक कामगिरी' हा पुरस्कार जाहीर केला आहे. 
          डॉ. राणी भगत यांचे प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण होळ आठ फाटा व व सोमेश्वर नगर येथे झाले. तर पदवी शिक्षण वनस्पतीशास्त्र विषय घेऊन शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर बारामती येथे झाले व पदव्युत्तर शिक्षण  पुणे विद्यापीठ व डॉक्टरेट संशोधन आघरकर संशोधन संस्था पुणे येथून पूर्ण केले.
        पुणे विद्यापीठाकडून त्यांच्या संशोधन कार्यासह, प्रसिद्ध झालेले शोधनिबंध, सुरू केलेले नवोपक्रम, प्लास्टिक कचरा संकलन व विल्हेवाट, जैव विविधता संवर्धन, फ्लोरा ऑफ बारामती लेखन, फ्लोरा ऑफ मुळशी लेखन, देवरायांचे संवर्धन, आंतरराष्ट्रीय परिषदांमधील संशोधन पत्र वाचन व मार्गदर्शन, क्रमिक व संदर्भीय पुस्तकांचे लेखन, महाविद्यालयीन पातळीवरील विविध समित्यांमधील सहभाग व यश, क्रमिक व संदर्भीय पुस्तकांचे लेखन, तज्ञ व्याख्याने,  प्रशिक्षणे-कार्यशाळा-परिसंवाद इत्यादींचे आयोजन, विविध संस्थांची असलेली संलग्नता व सल्ला मार्गदर्शन कार्य, वनस्पती संग्रह व नमुने निर्मिती इत्यादी दैदिप्यमान कामगिरीची दखल घेतली गेली.
           डॉ राणी भगत यांचा प्रदीर्घ असा 14 वर्षांचा शैक्षणिक आलेख असून यामध्ये त्या वेगवेगळ्या संस्थांकडून वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित झाल्या असून,  सरवित्कृष्ट संशोधन सादरीकरणासाठी त्या सुवर्णपदकाने ही सन्मानित आहेत, त्यांनी अनेक संशोधन प्रकल्पही पूर्ण केलेले असून त्यातही त्यांना सन्मान मिळाला आहे.
       सध्या त्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप कॉलेज येथे सहयोगी प्राध्यापक व संशोधक मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.

To Top