Breaking News l तुळजापूर येथे पुण्यातील ट्रॅव्हल्स बस उलटली : एक महिला ठार तर ४५ जण जखमी

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
तुळजापूर : प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील मोशी येथून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेली खाजगी बस बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शहरालगतच्या घाटात उलटली. या घटनेत एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून, ४५ भाविक जखमी झाले आहेत. यातील १८ जण गंभीर असल्याने त्यांना धाराशिवच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
       अपघातातील एका जखमीने दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील मोशी येथील ४६ भाविकांना घेऊन एक खाजगी ट्रॅव्हल्स बुधवारी सकाळी ६ वाजता तुळजापूरकडे रवाना झाली. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तुळजापुरात दाखल झाल्यानंतर या भाविकांची सोय केलेल्या लोहिया मंगल कार्यालयात सर्वांनी जेवण घेतले. यानंतर देवीचे दर्शन करुन सर्व भाविक त्याच बसने मोशीकडे जाण्यासाठी सायंकाळी ६ वाजता परतीच्या प्रवासाला लागले. मात्र, शहराला लागूनच असलेल्या घाटातील एका वळणावर ही बस रस्त्यावरच उलटली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तसेच शहरातील नागरिकांनी याठिकाणी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेत मोशी येथील रेखा गणपत ओव्हाळ या महिला भाविकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर ४५ भाविक जखमी झाले आहेत. बसमधील सर्व भाविक मोशी व डूडुळगाव येथील रहिवासी आहेत.
To Top