सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
माहेरहून पैसे आणण्यासाठी व तू आल्यापासून आम्ही कर्जबाजारी झालो. असे म्हणत तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी बारामती पोलीसात नवरा, सासू, सासरे, दिर, नणंद व जाऊ अशा आठ जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्राथमीक आरोग्य केंद्रात नर्स म्हणून कामाला असलेल्या आरती निलेश लोणकर वय २९ रा. जामदार रोड बारामती यांनी पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नवरा निलेश मारुती लोणकर वय ३५ वर्षे, सासु वंदना मारुती लोणकर वय ५८, सासरे मारूती वय ६५, दिर उमेश मारुती लोणकर व मंगेश मारुती लोणकर, जाऊ शुभांगी, उमेश लोणकर, ननंद उमा नितीन घनवट वय 33 व नितीन घनवट वय 42 वर्षे दोघे रा. डोर्लेवाडी ता. बारामती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.1 सप्टेंबर 2020 पासुन ते दि. 24 जानेवारी 2025 पर्यंत आरती यांचे पती निलेश, सासु वंदना, सासरे मारूती, दिर उमेश, व मंगेश, जाऊ शुभांगी, नणंद उमा घनवट व तिचा पती नितीन धनवट रा. डोर्लेवाडी ता. बारामती यांनी मला माहेरवरून पैसे आण तसेच तु घरी आलेपासुन आम्ही कर्जबाजारी झाले आहे असे म्हणुन मानसिक व शारिरीक छळ केला आहे व हाताने मारहाण केली आहे पती निलेश याने आरती यांचा गळा दाबुन व फिनेल पाजुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.