Baramati News l सुपे महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची टीसीएस कंपनीत निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव 
बारामती तालुक्यातील सुपे येथील विद्या प्रतिष्ठान संचलित असलेल्या  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची टीसीएस कंपनीमध्ये निवड झाली आहे. 
          या टीसीएस मध्ये निवड होण्यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा व मुलाखतीची तयारी करण्यासाठी पाच दिवसीय सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळेचे आयोजन केले होते.
        त्यानुसार तृतीय वर्ष विज्ञान शाखेतील आलिया बागवान, तृतीय वर्ष वाणिज्य शाखेतील श्रावणी केदार, आणि तृतीय वर्ष बीबीए आयबी मधील राज सूर्यवंशी या तीन विद्यार्थ्यांची निवड टीसीएस या नामांकित कंपनीत झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय काळे यांनी दिली.
        याकामी विद्या प्रतिष्ठान संस्था ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा. विशाल कोरे, प्रा.दीपक कुंभार तसेच सर्वं स्टाफने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव ॲड. नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, मॅनेजमेंट कौन्सिलचे सर्व सदस्य, रजिस्ट्रार श्रीश कंबोज, तसेच पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या यशाचे विशेष कौतुक केले आहे.
               ...........................
To Top