सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील दंडवाडी येथील राम मंदीरामध्ये कृषी विभागाच्यावतीने अन्न आणि पोषण सुरक्षा अंतर्गत कडधान्य विकास कार्यक्रमांतर्गत हरभरा पीक प्रात्यक्षिक व घाटी अळी एकात्मिक नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी झायटॉनिक कंपनीचे व्यवस्थापक डॉ. स्वप्नील जाधव यांनी पिकाचे खत व्यस्थापन, जैवीक खतांचा वापर, या विषयावर मार्गदर्शन केले. तर हरभरा लागवड तंत्र व उत्पादन वाढ, तसेच बियाणे निवड, बिजप्रक्रिया, तण नियंत्रण, सूक्ष्म मुलद्रव्य यांचा वापर, घाटे अळीचे एकात्मिक नियंत्रण आदीचा अवलंब केल्यास उत्पादनात निश्चित वाढ होते असे मार्गदर्शन कृषी सहाय्यक अमोल लोणकर यांनी केले.
बारामती तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुपे येथील मंडळ कृषी अधिकारी सी. के. मासाळ, कृषी पर्यवेक्षक प्रशांत मोरे, माजी चेअरमन बापूराव चांदगुडे, संदीप चांदगुडे, पोलिस पाटील गणेश चांदगुडे, ग्रा. पं. सदस्य नवनाथ जगताप आणि प्रकल्पातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार येथील उपसरपंच शांतराम चांदगुडे यांनी केले.
...............................