सोमेश्वर रिपोर्टर टीम------
माळेगाव : प्रतिनिधी
रात्री ११ नंतर हॉटेलमध्ये घुसून शिवीगाळ करत मला दारू देत नाहीस का..आमच्या गावात हॉटेल चालवून आम्हाला नडतो. तुला आता सोडणारच नाही असे म्हणत हॉटेल मॅनेजर व कामगारावर चाकूने हल्ला करणाऱ्या तिघा हल्लेखोरांच्या मुसक्या माळेगाव पोलिसांनी आवळल्या.
ही घटना दि. १३ रोजी बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथील हॉटेल शारदावर घडली. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क-हावागज ता. बारामती येथे हॉटेल शारदा एक्झिक्युटिव्ह बार, रेस्टॉरंट अँड लॉजींग ही आस्थापना काल दि. 13 रोजी रात्री 10 वाजता बंद करून मॅनेजर तसेच इतर सर्व कामगार हे काम आवरून रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झोपण्यासाठी गेले असता मध्यरात्री 1.45 वाजण्याच्या सुमारास विशाल बाबा मोरे, संदेश उर्फ आबा अनिल शिंदे दोघेही रा. कऱ्हावागज ता.बारामती निखिल अशोक खरात रा.आमराई बारामती ता.बारामती जि.पुणे यांनी यातील कामगार व हॉटेल मॅनेजर ऋषिकेश भाऊसाहेब मिंड मूळ रा.कडा ता.आष्टी जि.बीड सध्या रा.हॉटेल शारदा बार अँड लॉजिंग कऱ्हावागज ता.बारामती जि.पुणे हे हॉटेल शारदा मध्ये झोपलेल्या रूममध्ये घुसून शिवीगाळ करीत मला दारू देत नाहीस का आमच्याच गावात हॉटेल चालून आम्हालाच नडतो काय आता तुला सोडत नाही आता आम्हाला नड असे बोलून मारहाण करून फिर्यादीस खाली पाडले तसेच त्यानंतर निखिल खरात याने त्याच्या जवळील असलेले धारदार चाकूने फिर्यादीवरून हल्ला केला असता ते पटकन मागे सरकले मुळे तो वार फिर्यादीच्या पायावर लागला त्यामुळे हॉटेलमधील कामगार मॅनेजरला वाचविणेसाठी मध्ये आला. हल्लेखोर निखिल खरात याने दिनेश वर्मा मूळ रा.उत्तर प्रदेश याचे पोटात धारदार चाकू खुपसून तसेच इतर कामगारांवर देखील चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर ते चारचाकी वाहनातून पळून गेले.
त्यानंतर विशाल बाबा मोरे, संदेश उर्फ आबा अनिल शिंदे, निखिल अशोक खरात हे दिघे फरार होण्याचे उद्देशाने पळून जात असताना त्यांना पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे यांचे पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक विश्लेषण आधारे हल्लेखोरांना पाठलाग करून आज दि. १४ रोजी पहाटे हडपसर गाडीतळ परिसरातून ताब्यात घेतलेले आहे.
सदरची कामगिरी पंकज देशमुखपोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिरादार अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, डॉ.श्री सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग, अविनाश शिळीमकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि. सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षकअमोल खटावकर, देविदास साळवे, पोलीस अंमलदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, ज्ञानेश्वर मोरे, नंदकुमार गव्हाणे, अमोल राऊत, सागर पवार, जयसिंग कचरे, अमोल कोकरे यांनी केलेली आहे.