Baramati News l सोमेश्वर कारखान्यावरील ऊसतोड मजुरांच्या मुलांना कोपीवर जाऊन रोज शिकविणाऱ्या शिक्षिकांचा पुण्यात गौरव

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेस कमिटी पुणे शाखेच्या वतीने  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती, राजमाता जिजाऊ जयंती यांच्या जयंतीनिमित्त रोजी पुणे शहर व जिल्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा सन्मान नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये सोमेश्वर कारखान्यावर सुरू असलेल्या कोपीवरची शाळा प्रकल्पात ऊस तोड मजुरांच्या मुलांना शिकविणाऱ्या अश्विनी लोखंडे, अनिता ओव्हाळ, आरती शिंदे-गवळी यांना नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले.

येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखानेवर येणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी कारखान्याच्या वतीने गेली चार वर्ष कोपीवरची शाळा हा अभ्यास वर्ग सुरू आहे. अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली पाच महिने मुलांना दररोज सायंकाळी 5 ते 9 या वेळेत शिक्षण दिले जाते. पत्रकार संतोष शेंडकर हे विनामानधन समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. सात शिक्षक या शाळेत गेली चार वर्ष संवेदनशीलपणे शिक्षण व त्यासोबत आरोग्य, स्वच्छता याबाबतीतही काम करत आहेत.  यातील महिला शिक्षक अश्विनी नवनाथ लोखंडे, आरती राजेंद्र गवळी, अनिता संतोष ओव्हाळ यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे, दैनिक संध्या वृत्तपत्राच्या संपादिका ज्योती नाळे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर, पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस शिक्षक कमिटीचे अध्यक्ष सचिन दुर्गाडे यांच्या हस्ते नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले. याप्रसंगी यशराज पारखी, अभय छाजेड,  द. स. पोळेकर, प्रल्हाद गिरमे, बाबुराव गायकवाड, आशुतोष पवार,  मारूती पवार,जालिंदर घाटे, पुष्पक कांदळकर,  गुलाबराव नेटके, उपाध्यक्ष धोंडीबा तरटे, डॉ. कल्याण वाघ , सुभाष ससाने, प्रियंका नेटके, हरिदास चव्हाण, धनंजय मदने, विठ्ठल रणशूर,  उपस्थित होते. 
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर अध्यक्ष विजय कचरे तर उपस्थित मान्यवरांचे आभार जिल्हा अध्यक्ष रामप्रभु पेटकर यांनी केले.
To Top