Baramati News l चोपडजमध्ये पुन्हा महिलराज !सरपंचपदी मनीषा भोसले

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
चोपडज ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या लागलेल्या निवडणुकीत मनिषा संदीप भोसले यांनी सहा मते मिळवत बहुमताने निवडून आल्या तर विरोधी उमेदवारास  तीन मते मिळाली. चोपडज अंतर्गत कानाडवाडी वस्तीला पहिल्यांदा महिला सरपंच मिळाल्या आहेत.
          मागील वर्षी न्यायालयीन प्रक्रियेतुन चोपडजच्या सरपंचपदी पुष्पलता जगताप अपात्र झाल्या होत्या. त्या जागेसाठी १६ डिसेंबर २०२३ रोजी झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत रूक्मिणी बारीकराव पवार यांनी पुष्पलता जगताप यांच्याच गटाच्या मनिषा संदीप भोसले यांचा अवघ्या एका मताने पराभव केला होता.
यामुळे सत्तापरिवर्तन घडून आले होते. आता एक वर्षाची ठरलेली मुदत सम्पल्यावर रूक्मिणी पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये मनिषा भोसले यांनी जयश्री संदीप गाडेकर यांच्यावर सहा विरूध्द तीन अशा फरकाने मात करत पराभवाची सव्याज परतफेड केली. मंगल गायकवाड, सागर गाडेकर, तुकाराम भंडलकर, सुधीर गाडेकर, पांडुरंग कोळेकर हे सहा ग्रामपंचायत सदस्य मनीषा भोसले यांच्या बाजूने उभे राहिल्याने निवडणूक एकतर्फी झाली. 
          निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी अजित मोहिते यांनी काम पाहिले. ग्रामसेविका दीपाली लडकत यांनी सहकार्य केले. 
 पॅनेलप्रमुख प्रा. बाळासाहेब जगताप, नीरा बाजार समितीचे माजी सभापती संजय गाडेकर, निवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र भंडलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच राजेंद्र गाडेकर, भाऊसाहेब टकले, विठ्ठल जाधव, नरहरी भोसले, ज्ञानेश्वर कोळेकर, उत्तम लोणकर, मारूती कोळेकर आदी उपस्थित होते. 
नवनिर्वाचित सरपंच भोसले यांनी, गावाच्या विकासासाठी पक्ष, गट विसरून कटिबद्ध राहू असे सांगितले.
---
To Top