सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रतिनिधी
लोणंद गावच्या हद्दीत बसस्थानक समोर एस टी बसच्या चाकाखाली सापडून झालेल्या अपघातात सोपान महादेव रिटे वय अंदाजे 75 रा. तरडफ ता फलटण या वयोवृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत लोणंद पोलीस स्टेशन येथे करण्याचे चालले होते.
याबाबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहीती अशी की लोणंद गावच्या हद्दीत सायंकाळी सात च्या सुमारास बसस्थानक समोर सोपान महादेव रिटे हे चालले असताना बस्थानकातून बाहेर आलेली एस टी निरा -सातारा क्र-एम एच -०७ सी- ७०९८ही सातारा बाजूकडे जात असताना महादेव रिटे यांचा एस टी बसच्या चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत लोणंद पोलीस स्टेशन येथे चालू होते.