सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
महाराष्ट्रातील गड किल्ले हे शिवरायांच्या स्वराज्याचा अनमोल ठेवा आहेत. शेकडो वर्ष होऊन गेले तरी हे गड किल्ले आज शिवरायांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देत उभे असताना भोरच्या १२ मावळातील काही ध्येयवेड्या गडकोट प्रेमी युवकांनी एकत्र येत तब्बल ७ किल्ल्यांवर यशस्वीपणे १२ तासांमध्ये चढाई किल्ले सरकेले.
या बारा मावळातील युवकांनी आपली सुरुवात सकाळी पाच वाजता उधेवाडी राजमाची येथील शंभू महादेवाचे दर्शन घेऊन राजमाची किल्ल्याच्या मनरंजन बालेकिल्ल्यापासून केली.यानंतर श्रीवर्धन हा किल्ला सर केला.हा ग्रुप राजमाची पासून खाजगी वाहणाने प्रवास करून विसापूरला आले.लोहगड- विसापूर या जोडगोळीतील पहिला विसापूर किल्ला ता.मावळ सहज सर केला.पुढे दीड किलोमीटरचा प्रवास करून लोहगडावर आपली पावले ठेवली. लोहगडाचा तटबंदीयुक्त असा प्रवेश मार्ग अजोड आहे. शेवटचा महादरवाजा ओलांडून गडात प्रवेश होतो. गडावर शंभू महादेव मंदिर, गुहा,पागा,थडगे ,तलाव, विहीर, पाण्याची टाकी, अजस्त्र विंचू काटा माची, दर्गा व प्रसिद्ध लक्ष्मी गुफा पहावयास मिळतात.लगेचच गड उतार होऊन तिकोना येथे वितंडेश्वर या शंभू महादेवाचे दर्शन घेऊन ११ ओंकाराचा जप केला २३ किलोमीटरचा प्रवास करून तुंग पायथ्यास पोहोचून गडाची पाहणी केली. काही वेळाने कोरीगड याची पाहणी केली.असे सात किल्ले पार केले.यावेळी राजेंद्र चौघुले, लतिफ पटेल, मनोज जगताप,रामेश्वर खांडेभराड, बबन कदम, राजेंद्र शिंदे, वसंत कामथे, अनंता भागवत, रुपेश कुंभार, शांताराम नाणेकर, सुनील शेडगे उपस्थित होते.