सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
विसगाव खोऱ्यातील पळसोशी ता.भोर येथील ग्रामदैवत श्री वाघजाई देवीच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन यात्रा कमी केले होते. आखाड्यात भोर तालुक्यातसह जिल्ह्यातील दोनशेहून अधिक मल्लांनी हजेरी लावून नेत्रदीपक कुस्त्या करीत कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या ग्रामदैवतांचे यात्रा उत्सव सुरू झाले असून यात्रेनिमित्त बहुतांशी ठिकाणी कुस्त्यांच्या आखाड्यांचे आयोजन केले जात आहे.मागील पाच वर्षांपासून बहुतांशी गावांमध्ये लहान मल्लापासून ते मोठ्या मल्ल्यांपर्यंत ठरवून नियोजनबद्ध कुस्ती आखाडे भरविले जात असतात. पळसोशीच्या वाघजाई देवी यात्रा प्रारंभवेळी देवीला अभिषेक करून महाआरती करण्यात आली तर सायंकाळी छबीना काढून देवीची पालखीतून ग्राम प्रदक्षिणा घालण्यात आली.दुसऱ्या दिवशी लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते तर सायंकाळी जंगी कुस्त्यांचा आखाडा बनवण्यात आला. कुस्त्याखाड्यात ग्रामस्थांकडून ५१ रुपये ते ५ हजार रुपयांपर्यंत बक्षीस देवून कुस्त्या जोडल्या गेल्या. कुस्तीगिरांनी चितपट कुस्त्या केल्याने कुस्ती शौकीन भारावून गेले.कुस्त्यांचा आखाडा पाहण्यासाठी वीसगाव,चाळीसगाव खोऱ्यातील कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती.महिला मल्ल पै.धनश्री आवारे तसेच पै.दर्शना म्हस्के यांना यात्रा कमिटीकडून सन्मानित करण्यात आले.पंच म्हणून पै.आत्माराम म्हस्के,प्रकाश म्हस्के,तारक म्हस्के,तुकाराम दि.म्हस्के,मारुती राऊत,तुकाराम सो.म्हस्के, गोविंद म्हस्के,निवृत्ती म्हस्के यांनी काम पाहिले.