Purandar Breaking l एसटी बसच्या धडकेत दुचाकीवरील तिघे ठार : पुणे-पंढरपूर रस्त्यावरील जेजुरी नजीकची घटना

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
जेजुरी : प्रतिनिधी
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर बेलसर फाटा जवळ एस टी बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला. ही घटना दि. १६ रोजी सायंकाळी घडली. या अपघातात दुचाकी वरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. रमेश किसन मेमाणे (वय ६०), संतोष दत्तात्रय मेमाणे,(वय ४०) व पांडुरंग दामोदर मेमाणे (वय ६५) अशी या तिघांची नावे आहेत. तिघेही बोरमाळ वस्ती ,पारगाव मेमाणे ,ता पुरंदर जि पुणे येथील रहिवाशी आहेत. 
          या बाबत माहिती अशी की, सासवड जेजुरी रस्त्यावर (पालखी महामार्ग) बेलसर फाटा दरम्यान उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. दुचाकीवर असणारे तिघे जण रस्ता क्रॉस करून जात असताना एस टी बसने या तिघांना जोरदार धडक दिली. ही घटना दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. एस टी चालकाने गाडीचा वेग कमी करून बस रस्त्याच्या खाली घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकी गाडी बस खाली गेल्याने दुचाकीला फरफटत नेले. या अपघातात दुचाकी वरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एकाच वस्तीवरील तिघांचा या अपघातात मृत्यू झाल्याने पारगाव मेमाणे गावावर शोककळा पसरली आहे.
To Top