सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे
रांजने गावाजवळ रस्त्यांवर अपघात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली. याबाबात अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की रांजने गावाजवळ रस्त्यांवर अपघात युवकाचा मृत्यू झाला असुन याबाबतची तक्रार
राजु विठ्ठल शेंडकर यांनी दिली आहे
तक्रारीत राजू शेंडकर यांनी सांगितले आहे की माझा मेहुणा दत्ता गणपत राऊत, वय 31, रा. अंत्रोली, ता. वेल्हा, जि. पुणे हा पुणे येथे एका कुरिअर कंपनीत कामास असुन सध्या तो कामानिमित्त पुणे येथे रहाण्यास आहे. तसेच तो त्याचे वैयक्तिक वापरासाठीं हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स गाडी वापरत असुन तिचा नंबर MH-12/SM. 1851 असा आहे.
दि. 16/01/2025 रोजी स. 8.10 वा.चे सुमारास मला माझे साडु गणपत भिलारे यांनी फोन करुन कळविले की, त्यांचे गावातील एका व्हॉटसअप ग्रुपवर MH-12/SM. 1851 या गाडीचा रांजणे गावात पाबे ते खानापुर रोडवर अपघात झाल्याबाबत फोटो टाकले आहेत. गाडी ही दत्ता राऊत वापरतो तरी नक्की काय झाले आहे हे बघ, मी पण तेथे येतो असे बोलला. म्हणुन मी लागलीच ठिकाणी गेलो असता रांजणे गावामध्ये पाबे ते खानापुर रोडवर नळीचे ओढयाचे पुलाजवळ लोकांची गर्दी दिसल्याने मी त्या ठिकाणी थांबलो. तेव्हा MH-12/SM.1851 ही मो.सा. पुलाचे कठड्याजवळ खानापुर दिषेला तोंड करुन पडलेली होती. तर पुलाचे कठड्यापासुन खाली ओढयात एक इसम पालथे अवस्थेत पडलेला होता. मी जवळ जावुन पाहिले असता सदर इसम हा माझा मेहुणा दत्ता गणपत राऊत, (वय 31, )रा. अंत्रोली, ता. वेल्हा, याची होती. त्याचे कपाळावर जखम होवुन रक्त आलेले होते. त्याची काहीएक हालचाल होत नसल्याने मी त्यास लोकांचे मदतीने ग्रामीण रुग्णालय, वेल्हा येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी तपासुन तो मयत झाल्याचे घोशित केले घटना ज्या ठिकाणी घडली तिथे वळण असुन बहुधा अपघात हा गाडी कंट्रोल न होवुन गाडी पुलाला धडकुन त्यात पुलावरुन दत्ता खाली पडुन त्याचे डोक्याला मार लागल्यामुळे झाला आहे.रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात चालविल्याने वळणावर गाडी कंट्रोल न झाल्याने गाडी स्लीप होवुन पुलाचे कठड्याला धडकुन त्यात तो पुलावरुन खाली ओढयात पडुन त्याचे डोक्याला जखम होवुन त्यात मयत झाला आहे. म्हणुन माझी त्याचेविरुद्ध तक्रार आहे.
याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक अमित देशमुख करीत आहेतः