सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी- विद्यार्थिनिंना शाळा महाविद्यालयांमध्ये तर महिला-पुरुष नोकरदार वर्गाला नोकरीनिमित्त पुणे येथे दैनंदिन ये-जा करावे लागत असते. प्रवासादरम्यान होणारी गैरसोय पाहता भोर किंवा भाटघर पर्यंत पीएमपीएल सुरू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे विद्यार्थी व प्रवासी संघटनेने आमदार शंकर मांडेकर यांना केली.
भोर तालुक्यातील भाडघर-आळंदे परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनी व महिला व नोकरदार वर्ग व ज्येष्ठ नागरिक यांच्या दृष्टीने व पर्यटनाच्या दृष्टीने भोर किंवा भाटघर धरण पर्यंत पीएमपीएल सेवा सुरू करण्यात यावी.एसटी बसची व्यवस्था अपुरी पडत असल्याने व अवैद्यवाहनांमध्ये जीव धोक्यात धरून खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो. या गोष्टींचा विचार करून कात्रज ते भोर किंवा भाटघर धरण पीएमपीएल सेवा सुरू व्हावी अशी मागणी भोर वेल्हा मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप,युवराज बांदल,अथर्व गायकवाड, इंद्रजीत सावंत, निसर्गराज मादगुडे,शिवम कारभळ,साई दाभाडे,यश लोखंडे, शिवराय बांदल,सिद्धार्थ धरफाळे,अक्षय मोरे उपस्थित होते.