Indapuar News l राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा अजब कारभार : गावातून जाणारे रस्त्याच्या ठिकाणी खोदली चारी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भिगवण : संतोष माने
 पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर, भादलवाडी गावाजवळ मुख्य रस्त्याच्या ठिकाणीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी शनिवारी मध्यरात्री मोठी  चारी खोदल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे.
          सकाळी या ठिकाणी दोन दुचाकीस्वार घसरून पडले. येणे जाण्यासाठी मोठी अडचण झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चा अजब कारभार दिसत आहे. मध्यरात्री बारा वाजल्यानंतर या ठिकाणी चारी खोदण्यात आली आहे. वास्तविक पाहता येतील ग्रामस्थांना कुठलीच कल्पना नव्हती. त्यामुळे सकाळी ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थ संतापले. या गोष्टीची माहिती मिळताच, गावचे सरपंच शिवाजीराव किसनराव कनेरकर, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती पराग भाऊ जाधव, तसेच इतर ग्रामस्थ गोळा झाले.भादलवाडी येथील ग्रामस्थांना किंवा शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी वाहनांसाठी जागाच नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. यानंतर सरपंच व माजी उपसभापती यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क केला. त्यावेळी काही अधिकाऱ्यांनी सांगितले, आम्हाला या गोष्टीची कल्पना नाही. परंतु आम्ही वरिष्ठांशी बोलून याची माहिती घेतो. दरम्यान भादलवाडी गावच्या कमानी लगत खोदलेली चारी वास्तविक पाहता लोकांसाठी त्रासदायक ठरत आहे. प्रत्येक व्यक्तीला किंवा शेतकऱ्यांना शेतासाठी जायचे असेल तर दोन किलोमीटर पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे जाऊन प्रवास करावा लागणार आहे. मात्र मेहरबान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी एका हॉटेल समोरील जागेच्या ठिकाणी चारी खोदलेली नाही. त्यामुळे येथील लोकांमध्ये अनेक शंका उपशंका निर्माण होत आहेत. गावच्या प्रवेशद्वाराजवळच आपण अपघाताचे कारण सांगून अशी चारी खोदत असाल तर इतर ठिकाणी असा दुजाभाव का ? आशा प्रश्न निर्माण    झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरांच्या अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर या ठिकाणी महामार्गावरती पेट्रोलिंग करणारी कार आली. त्यातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांशी संवाद साधला. मात्र या ठिकाणी खोदण्यात आलेली चारी बुजवण्यात आली नव्हती.
------------------------
राष्टीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांशी झालेले चर्चेनंतर गावचे सरपंच शिवाजीराव किसनराव कनेरकर व बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव यांनी जेसीबी मशीन आणून स्वखर्चाने येथील चारी बुजवली.
 
To Top