सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
फलटण : प्रतिनिधी
संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या विडणी ता
फलटण येथील अंधश्रद्धेतून महिलेच्या झालेल्या निर्घृण खुनाबाबत तिसऱ्या दिवशीही पोलिसांचा कसून तपास सुरू असून तिसऱ्या दिवशी या ठिकाणी मृत महिलेच्या हाताचे अवशेष सापडले आहेत. नैवेद्य म्हणून चारही दिशेला मृतदेहाचे चार तुकडे टाकले असल्याचा पोलिसांना संशय आहे.
याआधी महिलेच्या कंबरेखालील अर्धवट मृतदेह व कवटी आढळून आली होती व याठिकाणी अघोरी पूजेचे साहित्यही पडलेले होते. त्यामुळे हा प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मृतदेहाचा उर्वरित भाग शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. उर्वरित भाग शोधण्यासाठी परिसरातील १५ ते १६ एकरांतील ऊस तोडण्याचे काम सुरू आहे. यासाठी पाचशे मीटर परिसरात ऊसतोड कामगार, शेत मालकांशिवाय इतरांना प्रवेश बंदी पोलिसांनी केली असून कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. घटनास्थळी तीन दिवसांपासून पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्यासह पोलिस उपअधीक्षक राहुल धस, पोलिस निरीक्षक सुनील महाडीक घटनास्थळी ठाण मांडून आहेत.आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची फौज कसून तपास करत आहे सापडलेल्या मृतदेहाचे अवशेष वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
दरम्यान महिलेच्या शरीराचा कवटी व कमरेखालचा भाग व आता हात सापडला असला तरी उर्वरित भाग अद्यापही सापडत नसल्याने व घटनास्थळाच्या परिसरातील सुमारे १५ एकराहून अधिक ऊस तोडण्यात आला आहे मात्र याबाबत पोलीस यंत्रणेच्या हाती आरोपी व ठोस पुरावा सापडत नसल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.