पुरंदर l निधन वार्ता l पांगारे येथील अंजना काकडे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
पांगारे (ता.पुरंदर) येथील पुणे जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक स्व. एकनाथ पांडुरंग काकडे यांच्या पत्नी श्रीमती अंजना एकनाथ काकडे यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दुःखद निधन झाले . 
         त्यांच्या मागे चार मुले, चार मुली,सूना, जावई ,नातवंडे ,पतवंडे असा मोठा परिवार असून सर्वच आपापल्या क्षेत्रात उत्कृष्टरित्या कार्यरत आहेत . 
     उत्कर्ष इंग्लिश  स्कूलचे संस्थापक अध्यक्ष प्रा शरदचंद्र काकडे, ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे पुणे जिल्हा समन्वयक संतोष काकडे, सिने कलाकार संदीप काकडे ही मुले व पुरंदर तालुक्यातील पहिल्या महिला वकील शैलजा उदयसिंह पिसाळ, लेखिका सीमा काकडे-जगताप, शीला घोरपडे, शर्मिला पिसाळ या मुली आहेत.
           बीडचे भूतपूर्व जिल्हाधिकारी रवींद्र जगताप व सातारा बांधकाम समिती सभापती उदयसिंह पिसाळ या त्यांच्या जावई यांनी आपापल्या क्षेत्रात नावलौकिक कमावला आहे .देखणं व्यक्तिमत्व खानदानी संस्कार आणि गरिबांसाठी सर्वसामान्यांसाठी काम करण्याची तळमळ यामुळे पंचक्रोशीत त्यांच्या कार्याचा धबधबा होता .सहाव्या इयत्तेत असताना त्यांचे त्या काळात लग्न झालेले असताना शिक्षक पतीच्या मदतीने त्यांनी सासरमध्ये येऊन सातवीची परीक्षा पास केली होती . पांगारे गावात एसटीची सोय व्हावी यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना त्यांनी पत्र लिहिले होते .
To Top