Indapur News l संतोष माने l गेल्या वीस दिवसात उजनीच्या पाणी पातळीत १५ टक्क्यांनी घट : पाण्याचे समान वाटप करण्याची इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भिगवण : संतोष माने
पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील काही तालुके व सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी समजले जाणाऱ्या उजनीच्या पाणीपातळीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. 
        एक जानेवारी रोजी उजनी धरण 96 .92 टक्के होते. तर आजच्या परिस्थितीत म्हणजेच 20 जानेवारी रोजी दुपारपर्यंत उजनी धरण हे 81.96 टक्के आहे त्यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत गेले वीस दिवसात पंधरा टक्के घट झाली आहे. उन्हाळा सुरू होण्या अगोदरच उजनीच्या पाणी पातळीत घट होत असल्याने उजनीच्या पाणलोट क्षेत्रालगतचा शेतकरी जास्त चावला आहे. उजनी धरणाची निर्मिती तत्कालीन मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांच्या काळात झाली. त्यामुळे उजनी धरणाला यशवंत सागर असे संबोधले जाते. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यात असले तरी पाणलोट क्षेत्र मात्र इंदापूर तालुका, करमाळा तालुका, कर्जत तालुका येथील अनेक गावांमध्ये आहे. विशेषता अधिक पाणलोट क्षेत्र हे इंदापूर तालुक्यात आहे. इंदापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी उजनी धरणाच्या वेळी अधिक ग्रहण केल्याने गेले आहेत. मात्र दररोज उजनीच्या पाणी पातळीत घट होऊ लागल्याने शेतकरी वर्ग जास्त धास्तवाला आहे. मकर संक्रांतीच्या काळानंतर उन्हाची तीव्रता वाढत असते. त्यामुळे शेतीला पाणी सुद्धा अधिक लागते. परंतु सध्याच्या परिस्थितीत गेल्या वीस दिवसात उजनी धरणामध्ये पाणी पातळीत पंधरा टक्के घट झाल्याने आगामी उन्हाळ्याच्या काळात उजनीत किती पाणी राहील याबाबत तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे उजनीच्या पाणी वाटपाचे सम नियोजन करणे गरजेचे आहे. अन्यथा आगामी काळात इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था धरण उशाला..... कोरड घशाला अशी होईल.
--------------------
सध्याच्या परिस्थितीत सीना-माढा बोगदा 160 क्यूसेस, दहिगाव -80 क्यूसेस , टनेल -600 क्यूसेस, मुख्य कालवा 2500 क्यूसेस याद्वारे उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

To Top