सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील पत्रकार सत्यजीत रणवरे व संभाजी रणवरे यांच्या घरा वरती अज्ञात इसमान कडून ०६ जानेवारी रोजी पहाटे ०२:३० ते ०३:०० वाजले च्या सुमारास दगडफेक करण्यात आली.सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
निमसाखर येथील लोकमतचे पत्रकार सत्यजीत रणवरे व संभाजी रणवरे यांच्या राहत्या घरावरती ०२:३० च्या सुमारास दगड फेकण्यात आले.घरा वरती दगड पडत असताना सत्यजीत रणवरे यांनी शेजारील नवनाथ रणवरे, अजित रणवरे, राजेंद्र रणवरे यांना फोन करून याची कल्पना दिली.त्यानंतर सर्वजण बाहेर आले मात्र तो पर्यंत सदरील अज्ञात इसम फरार झाले होते.
सत्यजीत रणवरे हे निमसाखर मधील जलजीवन मिशन योजने च्या कामा संदर्भातील त्रुटी व नियमबाह्यते बाबतीत अमरण उपोषण करणार असल्याने तसेच इतर अवैध व्यवसायाच्या बातम्या वारंवार प्रसिद्ध करीत असल्यानेच अशा प्रकारे भ्याड हल्ला समाजकंटका कडून करण्यात आला आहे.या हल्ल्याची माहिती वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांना कल्पना देताच पंधरा मिनिटांत वालचंदनगर पोलीस स्टेशनची पेट्रोलिंग ची गाडी घटना स्थळी पोहचली.
सत्यजीत रणवरे व संभाजी रणवरे यांच्या घरा वरील हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करीत पत्रकार आघाडी कडून वालचंदनगर पोलीस स्टेशनला या घटनेच्या निषेधाचे निवेदन देण्यात आले असून अशा समाजकंटकाच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करुन दगड फेक करणारा गुन्हेगार व त्यांच्या मागचा आका शोधुन त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या पत्रकार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सदस्य संतोष दहिदुले, इंदापूर तालुका अध्यक्ष शिवाजी पवार, प्रसिद्धी प्रमुख अतुल सोनकांबळे,सलिम शेख, भिमसेन उबाळे, महेश कळसाईत, गणेश कांबळे, संतोष कदम, अमोल रजपूत, आदी पत्रकार उपस्थित होते.