Indapur News l संतोष माने l उजनी जलशयाच्या जलप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर ! शासकीय पातळीवर याची खरोखरच दखल घेतली जाणार का?

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भिगवण : संतोष माने 
इंदापूर -पुणे, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना वरदायिनी समजले जाणारे "उजनी धरण "आज स्थिति मध्ये ९० टकके आहे. परंतु  उजनी जलाशय प्रदूषण प्रश्न कायम् आहे.  
         पुणे जिल्ह्यातील इंदापुर, सोलापूर जिल्ह्यातील करमाला, अहिल्या नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अनेक गावाना है उजनी धरण वरदायिनी ठरले आहे मात्र पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर येथून येणारे घाण पाणी यामुळे उजनीच्या जलप्रदूषणात वाढ होत आहे. गेले काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी उजनी जलाशयाची पाहणी केली होती. त्यावेळी पाण्याचे नमुने तपासण्यात आले. यानंतर हे पाणी हात धुण्यास सुद्धा लाईक नाही असा निष्कर्ष निघाला होता. सध्याच्या परिस्थितीत आमच्या प्रतिनिधीने पाहणी केली असता भिगवन परिसरात अत्यंत हिरवट असे पाणी दिसून आले. त्यामुळे उजनीशयात किती जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. याचे उत्तर मिळते. गेल्या तीन वर्षात प्रथमताच जानेवारी महिन्यात उजनी जलाशयात प्रथम एवढा मोठा पाणीसाठा आहे. असे असले तरी उजनीचे जलप्रदूषण ही विशेषता इंदापूर तालुक्यातील लोकांसाठी धोक्याची घंटा आहे. पुणे शहर व वरील धरण पाणलोट क्षेत्रातील येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे उजनी धरणाच्या जलप्रदूषणामध्ये वाढ होत आहे. सामाजिक संस्था या जलप्रदूषणाबाबत आवाज उठवत आहेत. परंतु शासकीय पातळीवर कुठल्याही उपाययोजना होत नसताना दिसत आहेत. राजकीय नेते सुद्धा याबाबत अनभिज्ञ आहेत. काहीही असो उजनी जलाशयाचे पाणी शेतीसाठी उपयुक्त असले तरी पिण्यास किंवा वापरण्यास अयोग्य आहे हे मात्र तितकेच खरे. अनेक लोकप्रतिनिधी यांनी विधानसभेत उजनी जलाशयाच्या प्रदूषणाबाबत आवाज उठवला . मात्र त्याचे पुढे काय झाले याबाबत मात्र काही सांगता येत नाही. उजनी जलाशयावर सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने, सोलापूर महानगरपालिका यांची पाणीपुरवठा योजना, तसेच इंदापूर तालुक्यातील साखर कारखाने, आशिया खंडातील अग्रगण्य असा समजला जाणारा बिल्ड कागद प्रकल्प, यांसह अनेक पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र उजनी धरणातील जलप्रदूषणाचा मुद्दा मात्र अजूनही ऐरणीवर आहे. शासकीय पातळीवर याबाबत उपाययोजना व्हावेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
To Top