Indapur News l संतोष माने l राज्यात सरपंचांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर ? इंदापूर तालुक्यातील महिला सरपंचाला शिवीगाळ करत मारण्याची धमकी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भिगवण : संतोष माने
सध्या राज्यात बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. हे प्रकरण ताजे असताना त्यातच आज परळी तालुक्यातील सौदाना गावचे सरपंच यांचा अपघाती मृत्यू झाला, याबाबत अपघात की घातपात याविषयी विविध चर्चा रंगू लागले आहेत. 
      तसेच इंदापूर तालुक्यात सुद्धा तक्रारवाडी गावच्या महिला सरपंच यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत भिगवन पोलीस स्टेशनमध्ये तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जसे लोकसभेचे किंवा विधानसभेचे लोकप्रतिनिधी असतात. त्यांना आपण अनुक्रमे खासदार किंवा आमदार म्हणतो. तसेच गावचे सरपंच हे लोकप्रतिनिधी असतात. जर अशाच घटना वाढीस लागले तर गावचे सरपंच सुद्धा भीतीच्या वातावरणामध्ये आहेत. त्यामुळे गावचे लोक प्रतिनिधी तथा सरपंच यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोण कोणाला भीत नाही... आमचं काय होणार... अशी भाषा सुद्धा अनेक ठिकाणी वापरली जात असल्याने अनेक गावचे सरपंच भीतीच्या वातावरणाखाली आहेत. आम्ही दोन सरपंचांना याबाबत विचारले असता, त्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, बीड जिल्ह्यामध्ये अशा घटना घडत असतील तर, आम्ही काय करायचे. गावचा विकास करत असताना अनेक अडचणी येतात. कुणाला आनंद होतो, कोण नाराज होतो. परंतु गावाच्या विकासासाठी सर्वांना समजून घेत आम्ही विकास करतो. तरीसुद्धा अशा घटना घडत असतील तर आम्हाला सुद्धा नाईलाजास्तव सुरक्षा पुरवणे गरजेचे आहे. एकूणच बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यातील सर्व सरपंच भयभीत झाले आहेत हे या प्रकरणावरून दिसून येते. त्यामुळे राज्य सरकार या गोष्टीकडे कसे लक्ष देणार याबाबत सर्वांच्या नजरा लागले आहेत. सरपंच हा गावचा लोकप्रतिनिधी असतो. त्यांच्याबाबत अशा घटना घडत असतील तर, सर्वसामान्य नागरिकांनी करायचे काय ? हा प्रश्न मात्र अनुत्तरीचा आहे. त्यामुळे राज्य सरकारने सरपंच यांना संरक्षण देऊन पुढील भूमिका घ्यावी असा मतप्रवाह अनेक नागरिकांनी व्यक्त केला.
To Top