सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : संतोष माने
वेगावरती नाही नियंत्रण..... तर अपघाताला मिळेल आमंत्रण... अशी परिस्थिती सध्या पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झाली आहे. पूर्वी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा क्रमांक -9 ओळखला जात होता.
सध्याच्या परिस्थितीत हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक हा क्रमांक 65 म्हणून ओळखला जातो. या महामार्गावरती वाहनांची रेलचेल अधिक असते. अवजड वहाने किंवा ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर यांची संख्या लक्षणीय आहे. ओव्हरटिंग अर्थात पुढे जाण्याच्या प्रयत्नात अपघात घडत आहेत. वास्तविक पाहता, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा चौपदर्णीकरण आहे. परंतु पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असताना अनेक ठिकाणी एका लेन वरती चार चार वाहने अति घाई.... संकटात नेही ..... असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वास्तविक पाहता प्रादेशिक परिवहन विभाग (RTO ), महामार्ग पोलीस यांची पेट्रोलिंग कार फिरत असते. परंतु अनेक वाहनांना परावर्तक पट्ट्या किंवा परावर्तक दिवे (रिफ्लेक्टर) दिसत नाहित. अनेक ठिकाणी महामार्ग लगतचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळेस टायर पंचर किंवा वाहनाचा घोटाळा झालेली नादुरुस्त वाहने उभी असतात. यातून अपघाताचा प्रसंग सांभावतो. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग पोलीस यांनी एकत्रित येऊन या कामी उपाययोजना करणे गरजेचे आहे. महामार्गावरून जाणारे वाहने यांना रिफ्लेक्टर दिवे, परावर्तक पट्ट्या बसवणे गरजेचे आहे. तसेच वेगावर ती नियंत्रण ठेवण्यासाठी स्पीड गन मशीन काही अंतरावरती बसवणे हे सुद्धा गरजेचे आहे. वास्तविक पाहता महामार्ग पोलिसांची किंवा प्रादेशिक परिवहन विभागाची पेट्रोलिंग करणारी कार यामध्ये स्पीड गन मशीन चा वापर केला जातो. परंतु अनेक ठिकाणी अशा मशीन बसविल्यास संबंधित वाहनाचा वेग किती आहे. याचा अंदाज येईल. अन्यथा आपला प्रवास सुखकर होईल. हे महामार्गावरती दिशादर्शक फलकावरती वापरलेले ब्रीदवाक्य निष्पाप ठरेल हे मात्र तितकेच खरे.