Indapur News l 'कर्मयोगी' व 'निरा-भीमा' पहिली उचल जाहीर : लवकरच ऊस उत्पादकांच्या खात्यावर रक्कम होणार वर्ग

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
इंदापूर : संतोष माने
राज्याचे माजी सहकार मंत्री तथा राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या अधिपत्याखालील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना, तसेच नीरा -भिमा सहकारी साखर कारखान्याने सन 2024 -2025 सालचा ऊस गळीत हंगाम याचा हप्ता प्रति टन 2800 रुपये जाहीर केला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी तसेच सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 
             राज्याची माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. तर त्यांच्या अधिपत्याखालील दुसरा कारखाना नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने सुद्धा अनुक्रमे 2800 रुपये दर जाहीर केला आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये ऊस दराची चढाओढ सुरू असताना ते कामी वरील दोन्ही कारखान्यांनी उडी घेतली आहे. हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष आहेत. उसाचा चांगला दर जाहीर केल्याने सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याबाबत आम्ही काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सांगितले यावर्षी हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या दोन्ही कारखान्याच्या माध्यमातून उसाचा दर चांगला दिला आहे. याबाबत आम्ही समाधानी आहोत.
To Top