बारामती l निधन वार्ता l ढेकळवाडी येथील हर्षवर्धन चोपडे यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भवानीनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील ढेकळवाडीचे उपसरपंच हर्षवर्धन बाळासाहेब चोपडे वय ३५ यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.  
          गेले काही दिवस आजारी असल्याकारणाने त्यांना सुरुवातीला भाग्यजय हॉस्पिटल बारामती व नंतर पुणे येथील पुना हॉस्पिटल दवाखान्यात हलवले होते. पुणे येथील दवाखान्यामध्ये आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पाठीमागे आई-वडील, एक भाऊ, पत्नी, व दोन मुले असा परिवार आहे.
गेले वर्षभर ढेकळवाडी ग्रामपंचायत उपसरपंच पदाचा कार्यभार सांभाळत होते.  अत्यंत मनमिळावू, हाकेला धावून येणारा अशी त्यांची परिसरात ख्याती होती. अंत्यविधी काटेवाडी (खताळ पट्टा) येथे साडेअकरा वाजता होणार आहे.
To Top