सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : दिपक जाधव
शेतात काम करण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घराचा कडी कोयंडे काढुन रोख ७० हजारासह ८ तोळे, तर दुसऱ्या कुटुंबाची रोख १० हजार मिळुन औमारे ५ लाख ४८ हजाराची घरफोडी अज्ञात चोरट्यांनी केल्याची घटना शुक्रवार ( दि. ३ ) रोजी दुपारी दोन ते साडेतीनच्या दरम्यान बारामती तालुक्यातील खंडुखैरेवाडी येथे घडली.
भाऊसाहेब गुलाबराव खैरे यांचे कुटुंब स्वत: च्या शेतातील कामे करण्याकरीता गेले होते. त्यामुळे घराला कुलुन असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला. यावेळी घरातील रोख ७० हजार तसेच सोन्याचे दोन गंठण, दोन अंगठ्या आणि कानातील टॉप्स असे मिळुन ८ तोळे सोने तर येथील प्रकाश बाळासो कोंडे यांच्या घरातील रोख १० हजार असा सुमारे ५ लाख ४८ हजार किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन ते साडेतीनच्या दरम्यान घडली.
यासंदर्भातील फिर्याद भाऊसाहेब खैरे आणि प्रकाश कोंडे ( रा. खंडुखैरेवाडी ) यांनी पोलिसात दिली आहे. तर शेजारीच असलेल्या प्रकाश कोंडे यांच्या घराला कुलूप असल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. मात्र त्यांच्याकडे असलेल्या सुमारे १० हजाराच्या रोख रकमेशिवाय चोरट्यांना इतर काही मिळु शकले नाही. तर मोरगाव येथील ढोले मळ्यातही घर फोडल्याची घटना घडली मात्र येथील काही चोरीला गेले नसल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास सुपे पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक जिनेश कोळी करीत आहेत.
दरम्यान बारामतीचे विभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, सुप्याचे सपिनी मनोजकुमार नवसरे यांनी घटनास्थळी भेट देवुन पहाणी केली. यावेळी गुन्हे शाखेकडुन ठसे तज्ञ बोलविण्यात आले होते.
सद्या रब्बी हंगामातील असलेल्या पिकांची खुरपणी, पाणी देणे अशी कामे सुरु आहेत. शेतकरी वर्ग शेतातच दिवसभर काबाड कष्ठ करीत आहे. तर घराला कुलुप असल्याचा फायदा अज्ञात चोरटी घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
......................................