सुपे परगणा l कुतवळवाडीच्या उपसरपंचपदी राणी बोरकर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दिपक जाधव 
बारामती तालुक्यातील कुतवळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राणी काळुराम बोरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
       यापुर्वीचे उपसरपंच भानुदास सर्जेराव बोरकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्तपदी राणी बोरकर यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रुपाली लक्षीकांत भोसले होते. तर निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन ग्रामसेवक मंजिता भालेराव यांनी काम पाहिले. 
    याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य वेणु कुतवळ, दिपाली बोरकर, अतुल कुतवळ, महेश कुतवळ, सोनाली देवकाते, माजी उपसरपंच दत्तात्रय कदम, ॲड. दत्तात्रय बोरकर, संपत कुतवळ, मनोहर कुतवळ, शांताराम बोरकर, प्रकाश बोरकर आदी उपस्थित होते. 
          ......................
To Top