सुपे परगणा l सुपे येथे उद्यापासून प्राजक्ता व्याख्यानमाला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे येथे सोमवारपासून (दि. ६) तीन दिवस प्राजक्ता व्याख्यानमाला होत आहे.
      सुपे परगणा ग्रामस्थ व दानशूरांच्या सहकार्याने तसेच जीवन साधना फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्यावतीने प्राजक्ता मतिमंद विद्यालयाच्या आवारात विद्यालयाचे प्रेरणास्थान प्राजक्ता दिदी स्मृतीप्रित्यर्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे यंदाचे आकरावे वर्ष आहे.
           सोमवारी ( दि.६ ) राहुल शिंदे (गुरुजी) चापडगावकर यांचे 'छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची तरुणाई' या विषयावर व्याख्यान होणार आहे. 
        मंगळवारी ( दि.७ ) पुणे येथील बाबासाहेब खराडे यांचे 'हसण्यासाठी जन्म आपुला' या विषयावर व्याख्यान होणार आहे.
          तर बुधवारी ( दि.८ ) बारामती येथील रणजीत ताम्हाणे यांचे 'Unlok Your Potential - तुमच्या मनाची शक्ती उघडा' या विषयावर व्याख्यान होणार आहे. 
        गुरुवारी ( दि. २३ ) रोजी हिंदवी स्वराज्याचे संकल्पक श्री शहाजीराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळपासुन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०.०० वाजता बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांचे 'सुरक्षित वाहतूक व अपघात टाळण्यासाठी..' या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर सकाळी ११.०० वाजता इंटरनॅशनल जादूगार शिवम यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत.
          सातारा येथील तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व इतिहास अभ्यासक विक्रम कदम यांचे 'स्वराज्यसंकल्पक श्री शहाजीराजे भोसले' या विषयावर रात्री आठ वाजता व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश चांदगुडे व सचिव डॉ. श्रीप्रसाद वाबळे यांनी केले आहे. 
                   -------------------
To Top