सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी सरकारने सूरू केली आहे. त्यानुसार ज्या महिला निकषात बसणार नाहीत त्या महिलांना त्यांचे पैसे सरकारला परत करावे लागणार आहे.
राज्यातील अनेक शेतकरी महिला आहेत, ज्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेत आहेत. त्या शेतकरी महिलांचे अर्ज आता बाद होण्याची शक्यता आहे. कारण सरकारने ज्या महिला इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांना १५०० रूपये न शेतकरी सन्मान योजनेत सुमारे २० लाख, राज्य शासनाच्या कृषी थेट लाभ हस्तांतरण योजनेतील १० लाख ९० हजार ४६५ जणांना या नियमांचा फटका बसू शकतो. तिन्ही योजनेतील ३० लाख १० हजार ५५० शेतकरी बहिणींवर टांगती तलवार येऊ शकते.