पुरंदर l कोडीत खुर्दच्या सरपंचपदी छाया खैरे यांची बिनविरोध निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
 पुरंदर : प्रतिनिधी
कोडीत खुर्द (ता. पुरंदर )येथील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या  निवडणुकीत छाया दत्तात्रय खैरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी सचिन मोरे यांनी घोषित केले. यावेळी सहाय्यक म्हणून ग्रामसेविका शशिकला नवले, तलाठी सतीश मोकाशी यांनी काम पाहिले.
            सरपंच विशाल मंगलदास कांबळे यांनी राजीनामा दिल्यामुळे छाया खैरे यांची सरपंच पदी निवड झाली. यावेळी  उपसरपंच बेबीताई विठ्ठल खैरे, माजी सरपंच विशाल मंगलदास कांबळे,ग्रामपंचायत सदस्य प्रसाद प्रकाश खैरे, हेमलता शांताराम जाधव,योगेश सुरेश तळेकर,उपस्थित होते. माजी सरपंच विशाल कांबळे यांच्या हस्ते छाया खैरे यांचा सत्कार करण्यात आला.
      यावेळी अशोक खैरे, मोहन खैरे ,किरण खैरे ,हेमंत खैरे ,पोलीस पाटील उमेश तळेकर ,मनोहर तळेकर ,प्रल्हाद तळेकर ,विठ्ठल खैरे ,मुरलीधर तळेकर, मदन तळेकर, दत्तात्रय खैरे, रुक्मिणी खैरे आदी मान्यवर उपस्थित होते.
      गावकारभारी व सहकारी ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन विविध विकास कामांद्वारे कोडीत खुर्द गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच छाया खैरे यांनी सांगितले.


To Top