सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : प्रतिनिधी
सुपे ( ता. बारामती ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ मध्ये मंगळवारी ( दि. २१ ) आनंद बाजार आणि खाऊ गल्ली आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
येथील शाळेतील विदयार्थ्यांना व्यावसायीक ज्ञान प्राप्त व्हावे. यासाठी शाळेने आनंद बाजार भरवला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी लावलेल्या विविध स्टॉलला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांच्याकडून विविधि वस्तू खरेदी केल्या गेल्या.
यात पालेभाज्या, फळे, खाण्याचे विविध पदार्थ ठेवण्यात आले होते. यावेळी या आनंद बाजारात फाळ भाज्या आणि खाण्याचे पदार्थ खरेदी करुन पालकांनी खाण्याचा आनंद घेतला. या आनंद बाजारात २५ हजार रुपयांची उलाढाल झाली.
येथील शाळा नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवित असते. या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच शंकर शेंडगे, अशोक लोणकर तसेच ग्रामपंचायतचे सदस्य व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी येथील केंद्रप्रमुख शहाजी कुंभार, विस्ताराधिकारी गोविंद लाखे तसेच पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी निलेश गवळी आदींचे मार्गदर्शन लाभले असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका साधना लोणकर यांनी सांगितले.
..............................................