वेल्हे l मिनल कांबळे l परवा तोरणा किल्ल्यावर दिसला : आज पाडला बैलाचा फडशा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
वेल्हे : मिनल कांबळे 
राजगड तालुक्यातील गुंजवणे येथील पांडुरंग बबन कचरे या शेतकऱ्यांच्या दोन वर्षाच्या बैलावर बिबट्याने हल्ला केल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली राजगड व तोरणा किल्याच्या परिसरात बिबट्याच्या वावरामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
              तोरणा किल्ल्यावर गेल्या तीन दिवसांपसून बिबट्या ठाण मांडून बसला असल्याची घटना ताजी असतानाच आज राजगड पायथ्याशी गुंजवणी गावातील सायंकाळी सहाच्या सुमारास सर्व जनावरे रानातून परत घरी येत असताना अचानक येथील  पांडुरंग बबन कचरे या शेतकऱ्याच्या दोन वर्षाच्या बैलावर बिबट्याने अचानक हल्ला केला या हल्ल्यात या बैलाचा मृत्यू झाला आहे. वनविभागाला माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. येथील घटनेचा पंचनामा केला असुन नुकसान भरपाई साठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवले असल्याची माहिती वनपाल मनोज तारू यांनी दिली.
          गेल्या महिन्याभरापासून या परिसरात बिबट्या फिरत असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली तर मागील पंधरा दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याचे वासरू घराशेजारून बिबट्या घेऊन गेला होता. तोरणा किल्ल्यावर गेलेल्या बिबट्या अद्यापही किल्ल्यावरच आहे तर दुसरीकडे राजगड किल्ल्याच्या पायथ्याला दुसऱ्या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. राजगड व तोरणा हे दोन्ही किल्ले शेजारी शेजारी असल्याने या परिसरात असलेल्या बिबट्यामुळे येथील शेतकरी पर्यटक यांना धोका निर्माण झालेला आहे. वनविभागारी या बिबट्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी येथील स्थानिक ग्रामस्थ व येणारे पर्यटक करीत आहेत.
To Top