सुपे परगणा l सुपे-बारामती एसटी बसचे वेळापत्रक कोलमडले : विद्यार्थ्यांचे होतय शैक्षणिक नुकसान

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------   
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथुन बारामतीला जाणाऱ्या एसटी बसचे वेळापत्रक बिघडल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.
           सुपे ते बारामती या एसटी बसला सकाळ पासुन संध्याकाळी मुक्कामापर्यंत पाच फेऱ्या कराव्या लागतात. याअगोदर सुपा आणि राहु या एसटी बस त्या फेऱ्या करीत होत्या. मात्र मागिल अनेक महिण्यांपासुन राहु मुक्कामी एसटी बस बंद झाल्याने फक्त एकाच बसच्या सुप्यात पाच फेऱ्या होत आहे. 
           सकाळच्या सत्रात अडीच आणि संध्याकाळच्या सत्रात अडीच फेऱ्या सद्या एकच बस करीत आहे. मात्र या बसला सीएनजी भरण्यासाठी तसेच किरकोळ मेंटनंससाठी आगारात जावे लागते. त्यावेळी या बसला दिड ते दोनतास उशीर होतो. त्याचा परिणाम एसटीच्या वेळेपत्रकावर होत आहे. दुपारच्या सत्रात ही बस कधीच वेळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांना तासंतास बसची वाट पहात बसावे लागते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सुप्याकडे येण्यास उशीर होतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या आभ्यासावर परिणाम होत असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. 
          बारामती येथील बस आगारातील व्यवस्थापकांचे याकडे पुर्णत: दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे व्यवस्थापकांनी त्वरीत लक्ष देवुन बस वेळेत सोडावी अशी मागणी विद्यार्थ्यानी केली आहे. त्यांच्या या गलथान कारभाराला सुप्याकडील विद्यार्थी पुरते वैतागले असुन यापुढे बससेवा सुरळीत न केल्यास सुप्याकडे येणाऱ्या एसटी बस रोखुन धरण्यात येतील असा इशारा विद्यार्थीवर्गाने दिला आहे.          ..................................
To Top