सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
कोथरूड : प्रतिनिधी
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षणमंदिर इंग्रजी माध्यमातील तिसरीचा विद्यार्थी मिहित विक्रम ननवरे व त्याच्या तीन मित्रांना शाळेमध्ये मारामारी केली म्हणून पाच दिवसांसाठी रष्टीकेट करण्यात आले.
वर्गातील एक मुलगा चुकीचा वागल्यानंतर त्या विषयांमध्ये आपला काहीही संबंध नसताना मिहित ननवरे व त्याच्या मित्रांनी त्या मुलाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. यातून निर्माण झालेल्या वादावादीमध्ये विद्यार्थ्याला मारहाण करण्यात आली. वास्तविक चुकीचे वागल्यानंतर त्या विद्यार्थ्याबद्दल शिक्षकांना माहिती देणे आवश्यक असताना मारामारी केल्याबद्दल स्कूलच्या प्रिन्सिपल व वर्गशिक्षिका यांनी चारही मुलांना फैलावर घेतले.
सर्व मुलांच्या पालकांना बोलवून समज देण्यात आली . पालकांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर सर्व मुलांना पाच दिवसांसाठी होमवर्क करण्याच्या अटीवर आणि नंतर जबाबदारीने वागण्याच्या अटीवर रष्टीकेट करण्यात आले. प्रिन्सिपल मॅडम यांनी पाचही मुलांना जबाबदारीने वागण्याचे व चांगले विद्यार्थी बनवुन दाखवण्याचे आवाहन केले.