सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
भुईंज ता. वाई येथे शनिवारी पार पडलेल्या कॅबिनेट मंत्री जननायक आमदार केसरी किताब बैलगाडा शर्यत स्पर्धेत मुरूम ता. बारामती येथील स्वप्निल दीपक साखरे यांचा सुंदर आणि ऋतुजा गोरख मांगडे यांचा सोन्या या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावत एक लाख रुपये रोख आणि मंत्री केसरीचा किताब पटकावला.
भुईंज येथील फुलेनगर येथे भव्य ओपन बैलगाडा स्पर्धांचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या विविध भागातून आलेल्या तब्बल 531 बैलगाडा या शर्यतीत सहभागी झाले होते. स्पर्धेत 67 गट पळाले. 9 सेमी फायनल नंतर स्वप्निल दीपक शेठ साखरे यांच्या वेगाचा बादशाह असलेला सुंदर आणि सोन्या या बैलाने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. उपसरपंच शुभम पवार यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य बैलगाडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सुंदर या बैलाने या अगोदर पुसेगाव येथील मैदानासहा अनेक मैदान मारले आहेत .