सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर- आंबाडे मार्गावरील ता.भोर येथील वळणावर दोन दुचाकींचा समोरा समोर धडक होऊन एका ज्येष्ठाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिं.१८ रोजी घडली. तर दुसरा तरुण गंभीर जखमी असल्याने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सध्या मांढरदेवी गडावरील काळुबाई देवीचा यात्रा उत्सव सुरू आसल्याने भोर-आंबाडे मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वाहतूक सुरू आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार एक ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत लक्ष्मण जावळे वय -६० रा. नीरा ता. पुरंदर जि. पुणे व दुसरा निळकंठ येथील माजी सरपंच हे दोघे मांढरदेवी बाजूला टीव्हीएस कंपनीच्या दुचाकी ज्युपिटर गाडीवर जात होते. तर दुसरा दुचाकीस्वार मांढरदेवी कडून भोरकडे जात असताना समोरासमोर दोन गाड्यांची धडक झाली.या अपघातात जावळे या ज्येष्ठाचा जागेवरच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असून भोर येथून पुणे येथे उपचारासाठी दाखल पाठवण्यात आले आहे. भोर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.