सुपे परगणा l सुप्यात 'प्लॅस्टिक मुक्त' अभियानला सुरुवात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
सुपे ( ता. बारामती ) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने 'प्लॅस्टिक मुक्त गाव' या  अभियानला शुक्रवार ( दि. १७ ) पासुन प्रारंभ करण्यात आला. 
       यावेळी आठवड्यातील प्रत्येक शुक्रवारी दिड तास  'प्लॅस्टिक मुक्त गाव' ही स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या प्लास्टिक मुक्त अभियान या उपक्रमाच्यानिमित्ताने ग्रामपंचायत येथील येथे प्रभाग क्र. १ मधील साठेनगर, गणेश मंदीर व परिसरात शुक्रवारी ( दि. १८ ) सकाळी ११ ते १२.३० च्या दरम्यान या अभियानला सुरुवात करण्यात आली.
              यावेळी सुपे येथील रोटरी क्लब अंतर्गत इन्ट्रॅक्ट क्लब श्री शहाजी विद्यालयातील इयत्ता ९ वीतील ६० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेऊन प्लास्टिक मुक्त अभियानास सुरूवात करण्यात आली. यावेळी सर्वांनी प्रभाग क्र. १ आणि २ मधील सुमारे १५ ते २० गोण्या प्लॅस्टिक कचरा एकत्र गोळा करुन जाळुन टाकण्यात आला. हा उपक्रम असाच दर शुक्रवारी ११ ते १२.३० च्या दरम्यान चालु ठेवणार असल्याचे उपशिक्षक गायकवाड यांनी सांगितले. तर पुढील काळात येथील मयुरेश्वर प्रतिष्ठान, ग्रामपंचायत सदस्य आणि तरूण मंडळ सहभागी होवुन पुर्ण गाव प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार सरपंच तुषार हिरवे यांनी व्यक्त केला.
       या उपक्रमात येथील सरपंच तुषार हिरवे, उपसरपंच शंकर शेंडगे, माजी सभापती निता बारवकर, रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चांदगुडे, सचिव अशोक लोणकर, पोपट चिपाडे, अमोल बारवकर, बबनराव बारवकर, सुदाम बारवकर, आशावर्कर वैशाली बारवकर, सोनाली नवले, ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी, महिला कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशी उपस्थित होते. 
              ...............................
To Top