सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
निरा-बारामती रस्त्यावर चारचाकी व दुचाकी यांच्यात सामोरा समोर धडक होऊन दुचाकीवरील दोघे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. पणदरेखिंड येथे खामगळपाटी येथे ही घटना सकाळी पावणेबाराच्या आसपास घडली.
चारचाकी इनोव्हा ही बारामती वरून निरेच्या दिशेला निघाली तर दुचाकी निरेच्या दिशेने बारामतीकडे निघाली होती. वडगाव निंबाळकर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना उपचारासाठी बारामती येथे दाखल करण्यात आले आहे. दोन्ही जखमी बारामती तालुक्यातील करंजे गावाचे असल्याचे सांगितले जात आहे.