सोमेश्वर रिपोर्टर टीम------
नीरा : विजय लकडे
निंबुत येथे मध्यरात्री च्या सुमारास पाच घरांचे कडी कोंयडा तोंडून पाच घरांमध्ये प्रवेश करून आतील कपाटाची उचकापाचट करून ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. मात्र नक्की किती ऐवज चोरीला गेला आहे याबाबत पोलीस तपास करत आहेत.
यामध्ये औदुंबर भुजंगराव काकडे, आदिनाथ दगडोबा गायकवाड, चंद्रकांत शिवराम काकडे, नवनाथ आगवणे, यांच्या घरामध्ये चोरट्यांनी प्रवेश करून आतील कपाट तोडून कपाटातील मौल्यवान वस्तू तसेच रोख रक्कमे वर डल्ला मारला आहे. युवकांनी वेळीच सावध होत व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून निंबुत गावात चोर आले आहेत सावध रहा अशा आशयाचे मेसेज ग्रुप वरती सोडल्यामुळे ग्रामस्थ सतर्क झाले. गावातील युवक एकत्र येत रात्रभर जागते रहो चा नारा देत रात्र जागून काढली, करंजेपुल पोलीस चौकीस कळवल्यानंतर पोलीसाची गाडी तात्काळ निंबुत मध्ये दाखल झाली परंतु तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. गेल्या वर्षी निंबुत मध्ये असाच जबरी चोरीचा प्रयत्न झाला होता परंतु घरातील ग्रामस्थ वेळी जागे झाल्याने चोरट्यांच्या हाती काही लागले नव्हते. असाच काहीसा प्रकार काल मध्यरात्री निंबुत मध्ये घडल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. काही महिन्यांच्या अंतराने निंबुत मध्ये पुन्हा असा प्रकार घडल्यामुळे विशेषता महिला व मुलांच्यात यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे, अंदाजे पाच घरांमधील किती ऐवज चोरीला गेला आहे याची माहिती अद्याप मिळाली नाही. पुढील तपास करंजीपुल पोलीस करत आहेत.