सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
कोर्हाळे बु ता. बारामती येथील ज्ञानदेव भिकोबा धापटे यांचे वृद्धपकाळाने निधन झाले ते ९१ वर्षांचे होते.
ज्ञानदेव धापटे यांनी महसूल विभागात तलाठी या पदावर इंदापूर व बारामती या तालुक्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये काम केले. ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर मंडल अधिकारी म्हणून सेवा निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात, पत्नी, मुलगा, सुन, विवाहित दोन मुली असा मोठा परिवार आहे. प्रा. रामदास धापटे यांचे ते वडील होत तर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप धापटे यांचे चुलते होत.