सोमेश्वर रिपोर्टर टीम------
निरा : विजय लकडे
पुरंदर तालुक्यातील निरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे संदीप फडतरे यांची तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बारामती तालुक्यातील बाळासाहेब शिंदे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
पुरंदर तालुका आणि त्याचबरोबर बारामती तालुक्यातील ३६ गावांसाठीच कार्यक्षेत्र असलेल्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदाची निवड आज मंगळवारी दि. २५ रोजी करण्यात आली. सासवड येथील उपबाजारातील कार्यालयामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पारपडली. यामध्ये
सभापती व उपसभापती पदासाठी या दोघांचेच उमेदवारी अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे या दोघांची अनुक्रमे सभापती आणि उपसभापतीपदी निवड करण्यात आली. नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीवर यापूर्वी देखील अजित पवार यांचेच वर्चस्व राहिलेला आहे. यापूर्वीचे सभापती शरद जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी कार्यकाळ संपताच राजीनामा दिल्याने सभापती आणि उपसभापतीपद हे रिक्त झाले होते. या रिक्त पदांसाठी आज निवडणूक घेण्यात आली आणि यामध्ये ही निवड करण्यात आली. यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, पुरंदर तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे, उपाध्यक्ष उत्तम धुमाळ, मा. जि प सदस्य सुदामराव इंगळे, सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामथे नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती नंदूकुमार जगताप, प्रदीप पोमण, विठ्ठल मोकाशी, अनिल उरवणे आदी मान्यवर उपस्थित होते.