Baramati News l सुपे पोलिसांची दमदार कारवाई : ३५ लिटर क्षमतेचे ३५ कॅन ! ३५५ लिटर अवैद्य गावठी हातभट्टीची दारु : चार लाखांच्या मुद्देमालासह एकजण ताब्यात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------             
सुपे : दिपक जाधव
अवैद्य गावठी हातभटट्टी दारू घेवुन जाणाऱ्या टेंम्पोला मोरगाव चौकात ताब्यात घेवुन त्याच्या वाहनासह ३५५ लिटर अवैद्य दारु असा सुमारे ३ लाख ९५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात सुपे पोलिसांना यश आले. 
      पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, एका चारचाकी टेंम्पोत अवैद्य हातभट्टी दारुची वाहतुक होणार असल्याची माहिती खबर मिळाली होती. त्यानुसार मोरगाव चौकात पोलिसांकडुन सापळा लावुन शनिवारी ( दि. २२ )  दुपारी एक वाजता या टेंम्पोला ( एम. एच. ४२ ए. क्यु. २०१० ) पकडुन झडती घेतली असता त्यातुन ३५ लिटर क्षमतेचे १३ कॅन ४५ हजार किमतीची सुमारे ३५५ लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली. तर त्याचा टेंम्पो असे मिळुन सुमारे ३ लाख ९५ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच टेंम्पो चालक अभिजीत मोहन शिंदे (  रा. माळेगाव ता. बारामती जि पुणे ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
      सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, बारामतीचे उप. विभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, पोलिस उपनिरिक्षक जिनेश कोळी, जयवंत ताकवणे, पो. हवालदार रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे, पो. कॉ. सचिन दरेकर, सागर वाघमोडे, संतोष जावीर, तुषार जैनक, महादेव साळुंके, किसन ताडगे, पियुष माळी, सुरज साळुंखे आदींनी ही कारवाई केली. 
       ........................................
To Top