सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील काळखैरेवाडी येथील ज्ञानेश्वर भानुदास शेंडगे या मेंढपाळाच्या मुलाने जिद्दी तसेच चिकाटीच्या जोरावर चौथ्या प्रयत्नात मुंबई पोलीस झाल्याने परिसरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.
वडीलांचा घरात पिढ्यानं पिढ्या मेंढपाळाचा व्यवसाय त्यामुळे ज्ञानेश्वर याला ही घरच्या कामात लक्ष द्यावे लागत होते. हे सर्व करित असताना त्याने जिद्द व चिकाटी सोडली नाही. ज्ञानेश्वराने बी. ए. पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. शिक्षण सुरु असताना त्याने गवंडी काम, सेंट्रींगचे काम, ट्रक ड्रायव्हर आणि घर काम करुन वडीलांना हातभार लावण्याचे काम केले.
त्याने स्वराज ॲकॅडमी मध्ये एक वर्ष सराव केला. यावेळी त्याने ग्राऊंड आणि लेखी परिक्षेचे धडे घेतले. त्याला पहिल्या तिन प्रयत्नात यश आले नाही. मात्र त्याने जिद्द सोडली नाही त्यामुळे त्याने चौथ्या प्रयत्नात खाकी वर्दीला गवसणी घातली. यात त्याने १३६ गुण मिळविले. त्याने या कठिन परिस्थितीतुन मिळविलेल्या खाकी वर्दीचे सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे.
....................................