सोमेश्वर रिपोर्टर टीम------
दौंड : प्रतिनिधी
छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील छावा चित्रपट सध्या महाराष्ट्रासह देशभरात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा अप्रकाशित इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे चित्रपटाच्या कार्यकारी निर्माती श्रद्धा थोरात दौंड तालुक्यातील आहेत.
दौंड तालुक्यातील बोरी पारधी चे रहिवासी मुंबईचे माजी आमदार व कामगार नेते कै. काकासाहेब थोरात यांची नात व भीमा पाटसचे माजी व्हाईस चेअरमन आनंद थोरात यांची पुतणी तर कामगार नेते सदानंद थोरात यांची कन्या आहेत. या चित्रपटास भारतातीलच नव्हे तर जगातील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो तर या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा प्रथमच मोठ्या पडद्यावर नव्याने पाहायला मिळाल्यामुळे राजांचा ज्वलंत इतिहास हा येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे दौंड ची लेक असलेली श्रद्धा थोरात यांच्या या चित्रपटातील सहभागामुळे दौंडकर म्हणून तालुक्यातील सामान्य जनतेला याचा सार्थ अभिमान आहे, पुणे जिल्ह्यासह दौंड तालुक्यातून श्रद्धा थोरात यांचे कौतुक केले जात आहे.