Baramati News l शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेला कांदा शेतातून चोरला : सुपे पोलिसांनी कांद्याच्या पिशव्यासह आवळल्या तिघांच्या मुसक्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------      
सुपे : दिपक जाधव
वढाणे येथील शेतकऱ्याच्या शेतातील चोरीला गेलेल्या १३ पिशव्या कांदा हस्तगत करण्यात सुपे पोलिसांना यश आले. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 
        पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर चौधरी ( रा. वढाणे ) यांनी स्वत:च्या शेतात १३ पिशव्या कांदा भरुन ठेवला होता. यावेळी शेतात कोणी नाही याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी या कांदा पिशव्या पळविल्या असल्याने चौधरी याने पोलिसांकडे फिर्याद दिली. या संदर्भात आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना अप्पर पोलिस अधिक्षक गणेश बिरादार, विभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्याकडुन करण्यात आल्या होत्या. 
      त्यानुसार येथील सहाय्यक पोलिस निरिक्षक मनोजकुमार नवसरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस किसन ताडगे आणि महादेव साळुंके यांनी तपासाची चक्रे फिरवली. यावेळी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक बाबीच्या आधारे कांदा चोरीचा गुन्हा या आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपी अक्षय शांताराम गायकवाड ( वय २९ वर्षे ), सतिश हिरामण शिंदे ( वय २८ वर्षे ), गोरख दगडु लकडे ( वय २५ वर्षे, सर्व रा. वढाणे ता. बारामती जि. पुणे ) यांना अटक करण्यात आली. यावेळी त्यांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 
      यासंदर्भातील कारवाई पो.स.ई. जिनेश कोळी, पो. हवा. रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे, पो. कॉ. सचिन दरेकर, सागर वाघमोडे, संतोष जावीर, तुषार जैनक, महादेव साळुंके, किसन ताडगे आदींच्या पथकाने केली. अधिक तपास पोलीस हवालदार विशाल गजरे करीत आहेत.
        ....................................
To Top