Baramati News l उद्योजक आर. एन.शिंदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा २०२५ चा जीवनगौरव पुरस्कार उद्योजक आर. एन. शिंदे यांना जाहीर झाला आहे.
        मा. राज्यपाल, उच्च शिक्षण मंत्री, मा. कुलगुरू डॉ सुरेश गोसावी व विविध मान्यवरांचे उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. जेष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. शां. बा. मुजुमदार, भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, इतिहास संशोधक गो. बं. देगलूरकर ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर आदी दिग्गजांच्या पंक्तीत बापूंना हा पुरस्कार मिळणार आहे. 2007 पासून तिरुपती बालाजी हा मशरूम उद्योग देशात नंबर वन बनवणे. शेकडो महिलांना रोजगार मिळवून देणे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शालेय साहित्य, सायकल, दफ्तर याची मदत करणे, प्राथमिक शाळांना हायटेक करणे, अंगणवाडीच्या देशात आदर्श इमारती उभारणे, जिल्ह्यातील अंगणवाडी चुलमुक्त करताना जिल्हाभर गॅससिलिंडर व शेगडी प्रदान करणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तालुकाभर बस स्टॅन्ड बांधणे, काकडे महाविद्यालयासाठी दीड कोटीचे सांस्कृतिक सभागृह बांधून देणे, दुष्काळी स्थितीत तालुक्यातील विविध गावांना मोफत पाणीपुरवठा करणे, आरोग्यासाठी असंख्य लोकांना मदत करणे, परिसरात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, पर्यावरण क्षेत्रात मदत करणे अशा असंख्य कामांसाठी हा जीवनगौरव पुरस्कार शिंदे यांना दिला जाणार आहे.
 

To Top