सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वेल्हे : मिनल कांबळे
महाराष्टाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल राहुल सोलापुरकर यांच्या प्रतिमेस जोडे मारुन निषेध करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष शिवराज शेंडकर यांनी दिली.
महाराष्टाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल व आक्षेपार्ह वक्तव्य राहुल सोलापुरकर यांनी केले असुन समाजामध्ये सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम सोलापुरकर यांनी केले आहे.याबाबत वेल्हे पंचायत समितीसमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास दुधाचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर येथील परिसराची शिवप्रेमीकडुन स्वच्छता करण्यात आली.व राहुल सोलापुरकर यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले.राहुल सोलापुरकर यांनी चुकीचा इतिहास सागुन
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्याच्यावर ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी युवक कॉग्रेसकडुन तहसिलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.राहुल सोलापुरकर यांच्या प्रतिेमेस उपस्थितांनी जोडे मारले व त्याचा निषेध केला.
यावेळी युवक कॉग्रेसचे अध्यक्ष शिवराज शेंडकर,उपाध्यक्ष गणेश जागडे,माजी सभापती दिनकर सरपाले,माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर,मनसेचे तालुका अध्यक्ष दिगंबर चोरघे,अमोल पडवळ, निलेश पवार,गणपत देवगिरीकर सचिन राजिवडे,विशाल वालगुडे,एकनाथ गो-हे,नवनाथ कोंडे, महेश राऊत, समीर शिळीमकर, शोभाताई जाधव,, दिगंबर शिळीमकर,संतोष आखाडे,राजकुमार अलगुडे,शंकर रेणुसे,नाना शिर्के,दत्ता गायकवाड,अण्णा रेणुसे,सतीश लिम्हण,नवनाथ दारवटकर,लाला पवार, संदीप शेंडकर उपस्थित होते.