सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : दिपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे ग्रामपंचायत समोरील ओढा खोलिकरणाच्या कामास नुकताच प्रारंभ करण्यात आला. या खोलीकरणामुळे ओढ्यातील गाळ तसेच काटेरी झुडपे काढुन ओढ्याचे पात्र स्वच्छ व खोल होणार आहे. त्यामुळे येथील दुर्गंधी बंद होवुन याचा फायदा दोन्ही बाजुस असलेल्या घरांच्या कुपनलीकांना होणार आहे.
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात येत आहे. फोरमचे सदस्य सचिन सातव, सरपंच तुषार हिरवे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कामास सुरुवात करण्यात आली.
येथील ओढा खोलिकरणाचे सुमारे ७०० मिटर लांबीचे काम आहे. यामुळे जलपर्णी, प्लॅस्टीक आणि काटेरी झुडपे काढुन ओढ्याचे पात्र स्वच्छ होणार आहे. तसेच डासांमुळे होणाऱ्या आजाराचा बाधिकार होणार नाही.
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडीयाच्या माध्यमातुन पोकलेन मशीन उपलब्द करुन देण्यात आली आहे. तसेच त्यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या खर्चापोटी एका संस्थेच्या माध्यमातुन दोन लाख देण्यात आले आहेत. तर इतर येणारा खर्च ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच तुषार हिरवे यांनी दिली.
याप्रसंगी एन्व्हॉर्यमेंटल फोरमचे सदस्य सचिन सातव, अमोल कावळे, सुरेंद्र भोईटे, हेमंत शिंदे, सचिन पवार, माजी जि. प. सदस्य बी. के. हिरवे, बारामती दूध संघाचे संचालक सुशांत जगताप, उपसरपंच शंकर शेंडगे, शफिक बागवान, अशोक लोणकर, सुयश जाधव, विशाल चांदगुडे, सुदाम बारवकर, महेश चांदगुडे, सुयश जगताप, सुरेश कदम, श्रीकांत हिरवे, सादिक कोतवाल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
________________________